कलवारी वर्गाच्या पाणबुड्या भारतीय आरमाराच्या डीझेल-विद्युच्चलित पाणबुड्या आहेत. या पाणबुड्यांची रचना फ्रांसच्या स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुड्यांवर आधारित असून मुंबईतील माझगांव डॉक्समध्ये या बांधल्या जात आहेत.
या प्रकारच्या एकूण सहा पाणबुड्या बांधल्या जातील. त्यांपैकी आयएनएस कलवारी १४ डिसेंबर, २०१७ रोजी भारतीय आरमाराच्या सेवेत रुजू झाली तर इतर पाच पाणबुड्या भविष्यात येतील.
या पाणबुड्यांना पूर्वीच्या कलवारी वर्गाच्या पाणबुड्यांचीच नावे दिली आहेत.
कलवारी वर्गाच्या पाणबुड्या
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?