भावना कंठ ह्या भारतातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहे. त्यांना त्यांच्या दोन सहकारी मोहना सिंग आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासह पहिली लढाऊ वैमानिक म्हणून घोषित करण्यात आले आहे. जून २०१६ मध्ये या तिघींना भारतीय हवाई दलाच्या फायटर स्क्वॉड्रनमध्ये सामील करण्यात आले होते. त्यांना तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी औपचारिकपणे नियुक्त केले होते. भारत सरकारने प्रायोगिक तत्त्वावर महिलांसाठी भारतीय हवाई दलात लढाऊ विभाग उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, या तीन महिलांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली.
मे २०१९ मध्ये, लढाऊ मोहिमा हाती घेण्यासाठी पात्र ठरणारी ती भारतातील पहिली महिला लढाऊ पायलट ठरली.
भावना कंठ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?