मोहना सिंग जितरवाल ह्या भारतातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत. त्यांना त्यांच्या दोन सहकारी, भावना कंठ आणि अवनी चतुर्वेदी यांच्यासह पहिली महिला लढाऊ वैमानिक म्हणून घोषित करण्यात आले आहे. तिन्ही महिला वैमानिकांना जून २०१६ मध्ये भारतीय वायुसेनेच्या लढाऊ तुकडीमध्ये सामील करण्यात आले होते. त्यांना तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी औपचारिकपणे नियुक्त केले होते. भारत सरकारने प्रायोगिक तत्त्वावर महिलांसाठी भारतीय वायुसेनेमध्ये लढाऊ विभाग उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, प्रथम या तीन महिलांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली.
मोहना सिंग या खतेहपुरा (झुनझुनू) येथील असून त्यांनी आपले शालेय शिक्षण 'एर फोर्स स्कूल, नवी दिल्ली' येथून पूर्ण केले आहे आणि 'ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, अमृतसर, पंजाब' येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेक पूर्ण केले आहे. सिंगचे वडील प्रताप सिंग हे भारतीय हवाई दलाचे कर्मचारी आहेत आणि आई मंजू सिंग एक शिक्षिका आहेत. सिंग यांना रोलर स्केटिंग आणि बॅडमिंटन यासारख्या खेळांची आवड होती. याचसोबत त्यांना गायन आणि चित्रकलेचा देखील छंद होता.
९ मार्च २०२० रोजी तिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
मोहना सिंग
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.