ओरलँडो (फ्लोरिडा)

या विषयातील रहस्ये उलगडा.

ओरलँडो (फ्लोरिडा)

ओरलॅंडो (इंग्लिश: Orlando) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक मोठे शहर आहे. मध्य फ्लोरिडामध्ये वसलेल्या ओरलॅंडो शहराची लोकसंख्या २.३८ लाख तर ओरलॅंडो महानगर क्षेत्राची लोकसंख्या २०,८२,६२८ इतकी आहे. ओरलॅंडो हे फ्लोरिडामधील पाचव्या तर अमेरिकेतील ८०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

ओरलॅंडो हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट, युनिव्हर्सल ओरलॅंडो रिसॉर्ट व सीवर्ल्ड ओरलॅंडो ही तीन अतिविशाल मनोरंजन उद्याने (थीम पार्क) ओरलॅंडोमध्ये स्थित आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →