ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग ही स्टीव्ह मार्टिन आणि जॉन हॉफमन यांनी तयार केलेली एक अमेरिकन रहस्य-हास्य- नाट्य दूरदर्शन मालिका आहे. ही मालिका अनोळखी व्यक्तींच्या त्रिकूटावर केंद्रित आहे (स्टीव्ह मार्टिन, मार्टिन शॉर्ट आणि सेलेना गोमेझ यांनी साकारलेले) ज्यांना खऱ्या गुन्हेगारी पॉडकास्टमध्ये रस आहे. ते आर्कोनिया या इमारतीत झालेल्या संशयास्पद खूनांच्या एकामागून एक चौकशी करताना, मॅनहॅटनच्या अप्पर वेस्ट साइडवरील त्यांच्या उच्चभ्रू इमारतीत स्वतःचे पॉडकास्ट तयार करताना मित्र बनतात. ह्या पॉडकास्टचे शीर्षक आहे "ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंग".

मालिकेचे प्रत्येकी दहा भागांचे असे चार सत्र ऑगस्ट २०२१, जून २०२२, ऑगस्ट २०२३ आणि ऑगस्ट २०२४ मध्ये हुलूवर प्रदर्शित झाले. सप्टेंबर २०२४ मध्ये पाचव्या हंगामासाठी ही मालिका बनणार असे सांगीतले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →