एफ.आय.ए. फॉर्म्युला वन हंगामातील सर्वात यशस्वी चालकास फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद पुरस्कार देते. ग्रांप्रीच्या निकालांवर आधारीत गुण पद्धतीने यशस्वी चालकाची निवड करण्यात येते. सर्वप्रथम १९५० मध्ये निनो फरिन ने अजिंक्यपद पटकावले तर १९५३ मध्ये अल्बर्टो अस्कारी अजिंक्यपद एकापेक्षा अधिक वेळा जिंकणारा प्रथम चालक बनला.
एफ.आय.ए. अधिकृतपने हंगाम संपे पर्यंत विजेत्याची घोषणा करत नाही, परंतु एका चालकाने मिळवलेले गुण दुसरा कोणताही चालक पार करू शकत नसेल तर चालकाला अजिंक्यपद मिळाल्याचे म्हणले जाते. फॉर्म्युला वनच्या अत्ता पर्यंतच्या ६१ हंगामात, २५ वेळा चालक अजिंक्यपद शेवटच्या शर्यतीत ठरवण्यात आले. एखद्या हंगामात "सर्वात लवकर चालक अजिंक्यपद पटकवला" या खिताबाचा मान मायकल शुमाकरला मिळाला आहे, कारण २००२ च्या हंगाम संपायला ६ शर्यती बाकी होत्या, तरी त्याला "चालक अजिंक्यपद" देण्यात आले.
एकुन ३२ चालकांनी हे अजिंक्यपद मिळवले आहे, ज्या मध्ये मायकल शुमाकरला "सर्वात जास्त अजिंक्यपद" या खिताबाचा मान आहे. मायकल शुमाकरने ७ अजिंक्यपद मिळवले आहेत, त्याला "सर्वात जास्त एका-पाठोपाठील-एक अजिंक्यपद" या खिताबाचेही मान आहे जे त्याला २००० ते २००४ ह्या वर्षां मध्ये सलग ५ वेळा "चालक अजिंक्यपद" पटकवल्यामुळे, मिळले आहे.
फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.