फॉर्म्युला वन, अथवा एफ.१ म्हणुन संबोधित करण्यात येणारी ही एक उच्चस्तरीय मोटार स्पर्धा आहे, जी आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ (एफ.आय.ए) या संस्थे मार्फत चालवण्यात येते. फॉर्म्युला हा शब्द म्ह्णजे काही ठराविक नियम असलेला खेळ, जे सर्व खेळाडू, चालक व कारनिर्माते पालण करतात. कुठल्याही फॉर्म्युला वन हंगामात काही शर्यती घडवल्या जातात, ज्यांना ग्रांपी म्हणले जाते. ह्या ग्रांपी शर्यती सानुकूलित रस्त्यांवर चालवल्या जातात, ज्यांना सर्किट म्हणले जाते. चालकांना शर्यतीच्या निकालावरून गुण मिळतात, व जो चालक एखाद्या हंगामात सर्वात जास्त गुण जमवतो, तो त्या हंगामाचा अजिंक्यपदाचा मानकरी ठरतो. २०१७ मोनॅको ग्रांप्री शर्यतीचा समावेश केल्यावर, आज पर्यंत एकूण ९३२ शर्यती खेळवण्यात आल्या आहेत. १९५० ब्रिटिश ग्रांप्री ही सर्वात पहिली फॉर्म्युला वन ग्रांपी शर्यत होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फॉर्म्युला वन चालक यादी
यामागील विज्ञान आणि इतिहास.