द क्राउन

या विषयावर तज्ञ बना.

द क्राउन ही दुसरी एलिझाबेथ च्या कारकिर्दीबद्दलची एक ऐतिहासिक नाट्य दूरदर्शन मालिका आहे, जी पीटर मॉर्गन यांनी मुख्यतः लिहीली आणि तयार केली. नेटफ्लिक्ससाठी लेफ्ट बँक पिक्चर्स आणि सोनी पिक्चर्स टेलिव्हिजनद्वारे ही निर्मित आहे. मॉर्गनने हे चित्रपट द क्वीन (२००६) आणि त्याच्यावर आधारित नाटक द ऑडियंस (२०१३) मधून मालिका विकसित केली.

या मालिकेत १९४७ मध्ये राजकुमारी एलिझाबेथ आणि फिलिप माऊंटबॅटन यांच्या लग्नाच्या काही काळापूर्वी सुरुवात होते आणि प्रिन्स चार्ल्स व कॅमिला पार्कर बॉल्स यांच्या २००५ मध्ये झालेल्या लग्नापर्यंत जवळजवळ सहा दशके ह्यात दाखवली आहे. ह्याचे सहा सत्र आहे. मालिकेतील प्रमुख कलाकार दर दोन सत्रात बदलले गेले आहेत; उदाहरणार्थ, एलिझाबेथची भूमीका पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात क्लेअर फॉय, तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात ऑलिव्हिया कोलमन आणि पाचव्या आणि सहाव्या सत्रात इमेल्डा स्टॉन्टनने साकारली होती.

अभिनय, दिग्दर्शन, लेखन, चित्रीकरण आणि निर्मिती मूल्यासाठी समीक्षकांनी द क्राउनची प्रशंसा केली आहे. तथापि, त्याच्या ऐतिहासिक चुकांची टीका देखील केली गेली आहे, विशेषतः मालिकेच्या उत्तरार्धात. या मालिकेने उत्कृष्ठ नाटक मालिकेसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट टेलिव्हिजन मालिका-नाटकासाठी दोन गोल्डन ग्लोब पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →