मार्टिन हेटर शॉर्ट (जन्म: २६ मार्च १९५०) हा एक कॅनेडियन-अमेरिकन विनोदी कलाकार, अभिनेता आणि लेखक आहे. शॉर्ट हा एक उत्साही विनोदी कलाकार म्हणून ओळखला जातो ज्याला स्केच कॉमेडीमधील भूमिकांसाठी प्रसिद्धी मिळाली. त्यांनी असंख्य चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांमध्येही काम केले आहे. त्यांना २ प्राइमटाइम एमी पुरस्कार, २एसएजी पुरस्कार आणि १ टोनी पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. २०१९ मध्ये शॉर्टला ऑर्डर ऑफ कॅनडाचे अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.
२०१५ मध्ये, शॉर्टने सहकारी विनोदी कलाकार स्टीव्ह मार्टिनसोबत राष्ट्रीय स्तरावर दौरा करण्यास सुरुवात केली. २०२१ पासून, त्याने मार्टिन आणि सेलेना गोमेझ यांच्यासोबत हुलू कॉमेडी मालिका ओन्ली मर्डर्स इन द बिल्डिंगमध्ये सह-कलाकार म्हणून काम केले आहे. त्याच्या कामगिरीसाठी त्याला प्राइमटाइम एमी पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि क्रिटिक्स चॉइस टेलिव्हिजन पुरस्कारासाठी नामांकने मिळाली आहेत आणि एसएजी पुरस्कारही मिळाला आहे.
मार्टिन शॉर्ट
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.