ओटावा नदी (इंग्लिश: Ottawa River; फ्रेंच: Rivière des Outaouais) ही कॅनडा देशामधील एक नदी आहे. ऑन्टारियो व क्वेबेक ह्या कॅनडाच्या प्रांतांची बरचशी सीमा ह्या नदीवरून आखली गेली आहे.
ओटावा नदी क्वेबेकच्या निर्मनुष्य पश्चिम भागात उगम पावते व नैऋत्येकडे वाहत जाऊन सेंट लॉरेन्स नदीला मिळते. ओटावाची एकूण लांबी १,२७१ किमी (७९० मैल) असून कॅनडाची राष्ट्रीय राजधानी ओटावा तसेच मॉंत्रियाल हे क्वेबेकमधील प्रमुख शहर ओटावाच्या काठांवर वसली आहेत.
ओटावा नदी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?