मुठा नदी पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. ह्या नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगेत होतो. ती पूर्व दिशेला वाहते. पुणे शहराच्या पूर्व बाजूस मुठेचा संगम मुळा नदीशी होतो. ही मुळा-मुठा नदी पुढे जाऊन अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे भीमा नदीस मिळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुठा नदी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.