रत्‍नागिरी जिल्हा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

रत्‍नागिरी जिल्हा

रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा (जुने नाव कुलाबा जिल्हा) आहे. रत्‍नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे.

हल्लीचा रत्‍नागिरी जिल्हा हा ब्रिटिश काळात आणि नंतरही उत्तर रत्‍नागिरी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. हल्लीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा म्हणत. दक्षिण रत्‍नागिरी जिल्ह्यात सावंतवाडी या संस्थानाचाही समावेश होता. सन १९८१ साली या जिल्ह्यांची नावे बदलली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →