ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकूल (युक्रेनियन: Національний спортивний комплекс "Олімпійський") हे युक्रेन देशाच्या क्यीव शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम व क्रीडा संकुल आहे. इ.स. १९२३ मध्ये बांधल्या गेलेल्या व युक्रेनमधील सर्वात मोठ्या असलेल्या ह्या स्टेडियममध्ये युएफा यूरो २०१२ स्पर्धेमधील काही साखळी सामने व अंतिम फेरीचा सामना खेळवला जाईल. ह्या स्पर्धेसाठी ह्या स्टेडियमचे मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली व नव्या स्टेडियमचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्तोर यानुकोव्हिच ह्यांनी ऑक्टोबर २०११ मध्ये उद्घाटन केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकुल
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.