महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

या विषयावर तज्ञ बना.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (जुने नाव: सुब्रता रॉय सहारा स्टेडियम) हे स्टेडियम भारताच्या पुणे शहराजवळील एक क्रिकेट स्टेडियम आहे. पुण्याबाहेरील गहुंजे ह्या गावाजवळ मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गाच्या बाजूला असलेले हे स्टेडियम एप्रिल २०१२ मध्ये बांधले गेले.

पुण्यामधील नेहरू स्टेडियममधील सामन्यांच्या तिकिट वाटपावरून पुणे महानगरपालिका व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ह्यांदरम्यान भांडणे चालू होती. भारतामधील इंडियन प्रीमियर लीगची वाढती लोकप्रियता लक्षात घेता क्रिकेट असोसिएशनने नवे स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला. ह्या स्टेडियमसाठी पुण्याबाहेर गहुंजे गावाजवळील मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गालगतची जागा निवडण्यात आली. स्टेडियमच्या बांधकामाला ₹ १५० कोटी इतका खर्च आला. १ एप्रिल २००१२ रोजी तत्कालीन आय.सी.सी. अध्यक्ष व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार ह्यांनी नव्या स्टेडियमचे उद्घाटन केले. २०१३ मध्ये सुब्रता रॉयच्या सहारा इंडिया परिवाराने ह्या स्टेडियमचे नामकरण हक्क विकत घेतले व स्टेडियमचे नाव सुब्रता रॉय सहारा स्टेडियम असे ठेवले. सहारा पुणे वॉरियर्स ह्या आय.पी.एल. संघाचे हे गृहमैदान होते.

२०१३ साली पुणे वॉरियर्स संघावर बंदी घालण्यात आल्यामुळे व सहारा परिवार आर्थिक संकटात सापडल्यामुळे ह्या स्टेडियमचा वापर कमी झाला. सहाराकडून करारित मानधन न मिळाल्यामुळे असोसिएशनने ह्या स्टेडियमचे नाव पुन्हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम असे ठेवले.

२०१५ इंडियन प्रीमियर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे काही सामने येथे खेळवण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →