१९४८ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची पाचवी आवृत्ती होती. ही स्पर्धा स्वित्झर्लंड देशाच्या सेंट मॉरिट्झ ह्या गावामध्ये जानेवारी ३० ते फेब्रुवारी ८ दरम्यान खेळवण्यात आली. १९३६नंतर १२ वर्षांच्या प्रदीर्घ काळाने ही स्पर्धा प्रथमच भरवण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात पराभूत जर्मनी व जपानना ह्या स्पर्धेचे आमंत्रण नव्हते.
दुसऱ्या महायुद्धामुळे युरोप व इतरत्र देशांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्यामुळे ह्या स्पर्धेच्या आयोजनात अनेक आर्थिक अडचणी आल्या. तसेच सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडे पुरेशी साधने नव्हती.
१९४८ हिवाळी ऑलिंपिक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.