ऑल इंग्लंड लॉन टेनिस आणि क्रोके क्लब ( एईएलटीसी ) तथा ऑल इंग्लंड क्लब हा इंग्लंडच्या लंडन शहराील खाजगी सदस्यांचा क्लब आहे. विम्बल्डन उपनगरातील या क्लबमध्ये हे विम्बल्डन स्पर्धा खेळली जाते. ही एकमेव ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा अजूनही गवतावर खेळली जाते. या स्पर्धेची ख्याती आता क्लबपेक्षा अधिक आहे.
या क्लबमध्ये २७५ पूर्ण सदस्य, सुमारे १०० तात्पुरते खेळणारे सदस्य आणि अनेक मानद सदस्य आहेत. पूर्ण किंवा तात्पुरता सदस्य होण्यासाठी, अर्जदाराने चार विद्यमान पूर्ण सदस्यांकडून समर्थन पत्र प्राप्त करणे आवश्यक आहे, त्यापैकी दोन अर्जदारास किमान तीन वर्षांपासून ओळखत असले पाहिजेत. त्यानंतर उमेदवारांच्या यादीत नाव जोडले जाते. क्लबच्या समितीद्वारे वेळोवेळी मानद सदस्य निवडले जातात. सदस्यांना विम्बल्डन स्पर्धेच्या प्रत्येक दिवसासाठी दोन तिकिटे खरेदी करण्याचा अधिकार आहे. या व्यतिरिक्त सर्व स्पर्धाविजेत्यांना सदस्य होण्यासाठी आमंत्रित केले आहे.
या क्लबची स्थापना सहा लोकांनी २३ जुलै, १८६८ रोजी ऑल इंग्लंड क्रोके क्लब म्हणून केली. त्यावेळी क्रोकेचा खेळ लोकप्रिय होता. १८७०मध्ये येथे पहिली क्रोके स्पर्धा आयोजित केली गेली. १८७५मध्ये येथे लॉन टेनिस खेळणे सुरू झाले. उद्देश पहिली पुरुषांची एकेरी टेनिस स्पर्धा जुलै १८७७ मध्ये आयोजित केली गेली. त्यावेळी क्लबने आपले नाव बदलून ऑल इंग्लंड क्रोकेट आणि लॉन टेनिस क्लब केले . त्या वर्षी सर्व्हिस अंडरआर्म करणे भाग होते. पहिल्या विजेत्या स्पेन्सर गोर यांच्या मते "लॉन टेनिस कधीच महान खेळ होणार नाही." १८७८ मध्ये कोर्टच्या मध्यातील जाळीची उंची बदलून टोकांना ४ फूट ९ इंच (१.४५ मी) आणि मध्यावर ३ फूट (०.९१ मी) इतकी करण्यात आली. टेनिसची लोकप्रियता वाढल्यावर १८८२मध्ये क्लबने आपल्या नावातून क्रोके वगळले. १८९९मध्ये ते पुन्हा घातले. तेव्हापासून क्लबचे नाव ऑल इंग्लंड लॉन टेनिस आणि क्रोकेट क्लब आहे.
ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोके क्लब
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?