द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन (इंग्लिश भाषा: The Championships, Wimbledon) ही टेनिस खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची स्पर्धा आहे. युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही स्पर्धा १८७७ सालापासुन खेळवली जात आहे. चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विंबल्डन ही सर्वात जुनी व अजुनही गवतापासुन बनवलेले कोर्ट (ग्रासकोर्ट) वापरणारी एकमेव स्पर्धा आहे.
पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी ह्या पाच प्रमुख स्पर्धा विंबल्डन दरम्यान भरवल्या जातात.
विंबल्डन टेनिस स्पर्धा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!