यू.एस. ओपन ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. टेनिस जगतातील चार महत्त्वाच्या व मानाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा न्यू यॉर्क शहराच्या क्वीन्स बरोमधील यू.एस.टी.ए. बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांदरम्यान भरवली जाते.
सर्वात पहिली यू.एस. ओपनची आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली ऱ्होड आयलंडच्या न्यूपोर्ट ह्या शहरात तर महिलांसाठी १८८७ साली फिलाडेल्फिया येथे खेळवली गेली. १९६८ सालापासून ही स्पर्धा खुली करण्यात आली. सध्या यू.एस. ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.
यू.एस. ओपन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.