एस.आय. पद्मावती

थोडक्यात पण महत्त्वाचे.

एस.आय. पद्मावती

शिवरामकृष्ण अय्यर पद्मावती (२० जून १९१७ – २९ ऑगस्ट २०२०) एक भारतीय हृदयरोगतज्ज्ञ होत्या. त्या नॅशनल हार्ट इन्स्टिट्यूट, दिल्लीच्या संचालक आणि ऑल इंडिया हार्ट फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष होत्या. ही संस्था प्रतिबंधात्मक कार्डिओलॉजीमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेसोबत सहयोग करते.

पद्मावती यांना १९९२मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण प्रदान करण्यात आला त्या नॅशनल ॲकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या निवडून आलेल्या फेलो होत्या. त्या भारतातील पहिल्या महिला हृदयरोगतज्ज्ञ होत्या आणि त्यांनी भारतातील पहिले कार्डियाक क्लिनिक आणि कार्डियाक कॅथेटर लॅबची स्थापना केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →