मालविका अय्यर (जन्म: १८ फेब्रुवारी, १९८९) ह्या एक समाजसेविका आणि अपंगत्व हक्क कार्यकर्त्या आहेत. लहानपणी अनवधानाने अय्यर यांनी ग्रेनेड उचलला होता, ज्यामुळे त्यांना आपले दोन्ही हात कायम स्वरुपी गमवावे लागले. अय्यर ह्या सुलभ फॅशनची एक मॉडेल देखील आहे. अय्यर यांनी २०१७ मध्ये मद्रास स्कूल ऑफ सोशल वर्क मधून सामाजिक कार्य विषयात मानद पदवी मिळवली. त्यांचा हा प्रबंध अपंग लोकांच्या प्रति हीन दृष्टिकोन ठेवण्याविषयीचा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मालविका अय्यर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?