एरएशिया (AirAsia) ही आग्नेय आशियाच्या मलेशिया देशामधील कमी दरात विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. भारतासह आशियामधील अनेक देशांमध्ये उपकंपन्या चालवणाऱ्या एरएशियाद्वारे २२ देशांमधील सुमारे १०० शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवली जाते.
सरासरी 0.023 अमेरिकन डॉलर प्रति किलोमीटर इतक्या कमी दरात विमानप्रवास उपलब्ध करून देणारी एरएशिया जगातील सर्वात स्वस्त विमानसेवा आहे. नोव्हेंबर १९९६ मध्ये एरएशियाची विमानसेवा चालू झाली. २ डिसेंबर २००१ रोजी ११ दशलक्ष डॉलर्स इतक्या रकमेने कर्जबाजारी झालेली एरएशिया कंपनी मलेशियन उद्योगपती टोनी फर्नांडिस ह्याने १ मलेशियन रिंगिट ह्या किंमतीस विकत घेतली. फर्नांडिसने कंपनीमध्ये मोठ्या सुधारणा घडवून आणल्या व एरएशियाला पुन्हा नफ्याच्या मार्गावर नेले. एरएशियाने मलेशिया एरलाइन्स ह्या प्रतिस्पर्धी कंपनीचे वर्चस्व कमी करण्यासाठी अनेक नवे मार्ग चालू केले व प्रवासदरांमध्ये लक्षणीय घट केली. २००३ साली एरएशियाने आंतरराष्ट्रीय विमानसेवेस प्रारंभ केला.
एरएशिया
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.