एर इंडिया

या विषयातील रहस्ये उलगडा.

एर इंडिया ही भारत देशाची राष्ट्रीय विमानवाहतूक कंपनी आहे. इंडिगो व जेट एरवेझ खालोखाल एर इंडिया भारतामधील तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी असून ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. एर इंडियाचे भारतातील चारही महानगरांमध्ये हब असून इतर अनेक शहरांमध्ये देखील मोठे तळ आहेत.

एके काळी भारतीय उपखंडामधील सर्वात मोठी विमानकंपनी असलेल्या एर इंडियाचा एकूण वाहतूकीमध्ये ६० टक्के वाटा होता. परंतु सरकारी गैरवापर व अनास्था, आर्थिक संकटे, युनियन समस्या इत्यादींनी ग्रासलेली एर इंडिया हळूहळू इतर खाजगी स्पर्धकांच्या तुलनेत मागे पडत गेली. सप्टेंबर २००७ ते मे २०११ दरम्यान भारतीय विमानवाहतूकीमधील एर इंडियाचा वाटा १९.२ टक्क्यांवरून १४ टक्क्यांवर घसरला. २०११ मध्ये भारत सरकारने एर इंडियाची मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना केली व तिला आर्थिक संकटामधून बाहेर काढले. ह्याच वर्षी इंडियन एरलाइन्सला एर इंडियामध्ये विलीन करण्यात आले. त्यानंतर प्रगतीपथावर असलेल्या एर इंडियाच्या आर्थिक तोट्यामध्ये लक्षणीय घट होत आहे. २०१४ मध्ये एर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमानसंघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

२०२२मध्ये टाटा उद्योगसमूहाने ही कंपनी विकत घेतली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →