एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२ या दुबईहुन मंगलोर येथे जाणाऱ्या बोइंग ७३७ या विमानास मंगलोर विमानतळावर उतरताना अपघात झाला. त्यात ६ विमान कर्मचारी व १६० प्रवासी (१०५ माणसे,३२ महिला,१९ मुले व ४ नवजात अर्भके) अश्या एकूण १६६ व्यक्ती होत्या. त्यापैकी फक्त ८ प्रवासी वाचले आहेत. यांपैकी फक्त एक प्रवासी काहीही जखमा न होता वाचला. चालकदलातील सर्व ६ लोकांचे निधन झाले. चालकदलात दोन महिला होत्या.हे विमान सुमारे अडीच वर्षे जुने होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२
यामागील विज्ञान आणि इतिहास.