टेल्युराइड प्रादेशिक विमानतळ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

टेल्युराइड प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: TEX, आप्रविको: KTEX, एफ.ए.ए. स्थळसूचक: TEX) हा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील टेल्युराइड शहरातील विमानतळ आहे. सॅन मिगेल काउंटीमध्ये शहराच्या सहा मैल पश्चिमेस असलेला हा सार्वजनिक विमानतळ टेल्युराइड प्रादेशिक विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीचा आहे. वा विमातळ समुद्रसपाटीपासून ९,०७८ फूट (२७६७ मीटर) उंचीवर आहे. जेव्हा डिसेंबर २०१६ मध्ये ग्रेट लेक्स एरलाइन्सने नियोजित प्रवासी सेवा पुन्हा सुरू केली तेव्हा टेल्युराइड उत्तर अमेरिकेतील नियोजित प्रवासी उड्डाणे असलेला सर्वात उंच व्यावसायिक विमानतळ होता. मार्च २०१८ मध्ये येथील सर्व विमानसेवा बंद झाली. ऑगस्ट २०१८ मध्ये बुटीक एरने पुन्हा एकदा येथे व्यावसायिक सेवा सुरू केली. २०२६मध्ये टेल्युराइड विमानतळ नियोजित प्रवासी उड्डाणे असलेला अमेरिकेतील सर्वात उंचीवरील विमानतळ आहे. लेडव्हिल विमानतळानंतर अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा उंचीवरील विमानतळ आहे. येथून डेन्व्हर एर कनेक्शन डेन्व्हर आणि फिनिक्सला दररोज फेरचाइल्ड डोर्नियर ३२८जेईटी प्रकारची विमाने वापरून विनाथांबा प्रवासी विमानसेवा पुरवते. ३२८जेईटी प्रकारची विमाने अतिउंच विमानतळांवर सक्षमपणे काम करू शकतात.

हा विमानतळ ५४२ एकर (२१९ ha) विस्ताराचा आहे. येथे ९/२७ दिशेने असलेली ७,१११ by १०० फूट (२,१६७ by ३० मी) लांबीची एक धावपट्टी आहे. ही धावपट्टी एका पठारावर आहे आणि तिच्या एका टोकाला ३०० फूट दरी आहे आणि दरीतून सान मिगेल नदी वाहते. वैमानिकांसाठी येथे उतरणे हा एक आव्हानात्मक परंतु सुंदर अनुभव असतो. पूर्वी हिवाळ्यात सुमारे २०% विमानांना हवामान अचानक प्रतिकूल झाल्याने इतर विमानतळांवर ऐनवळी जावे लागत असे येथीन खाजगी व्यावसायिक विमाने नियमितपणे टेलुराइड प्रादेशिक विमानतळावर येतात. येथून मॉन्ट्रोझ प्रादेशिक विमानतळ, ड्युरँगो-ला प्लाटा काउंटी विमानतळ आणि ग्रँड जंक्शन प्रादेशिक विमानतळ येथे इतर नियोजित प्रवासी जेट सेवा उपलब्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →