ईगल काउंटी प्रादेशिक विमानतळ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ईगल काउंटी प्रादेशिक विमानतळ

ईगल काउंटी प्रादेशिक विमानतळ (आहसंवि: EGE, आप्रविको: KEGE, एफ.ए.ए. स्थळसूचक: EGE), व्हेल-ईगल विमानतळ तथा ईगल-व्हेल विमानतळ हा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील जिप्सम गावात असलेला विमानतळ आहे. ईगल गावापासून ४ मैल आणि व्हेलपासून ३७ मैलांवर आहे. ६३२ एकर (२५६ ha) विस्ताराच्या या विमानतळावर एक धावपट्टी आहे. हा विमानतळ उड्डाण आणि अवतरणांसाठी अतिकठीण समजला जातो.



या विमानतळावरील वर्दळ मुख्यत्वे हंगामी असते आणि हिवाळ्यात अधिक नियोजित उड्डाणे असतात. स्की हंगामात हा विमानतळ डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर सर्वाधिक व्यस्त विमातळ असतो. येथून व्हेल आणि बीव्हर क्रीक स्की रिसॉर्ट येथून जवळ आहेत. अॅस्पेन विमानतळावरील हवामानावर विसंबून राहण्याऐवजी अनेक प्रवासी येथे येण्यास पसंती देतात. हा विमानतळ आय-७० महामार्गाद्वारे व्हेलपासून ४५ मिनिटांच्या अंतरावर आहे. युनायटेड एरलाइन्स आणि अमेरिकन एरलाइन्स या विमानतळावर वर्षभर सेवा देतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →