डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: NAG, आप्रविको: VANP) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथील विमानतळ आहे. याचे मुळचे नाव सोनेगांव विमानतळ आहे. हे महाराष्ट्रातील १८ विमानतळांपैकी एक आहे. येथून मुंबई व दिल्लीसह भारतातील अनेक मोठी शहरे तसेच शारजा, दुबई आणि दोहा येथे विमाने जातात-येतात.

नागपूर विमानतळावर नुकतीच इंड्रा ही रडार प्रणाली लावण्यात आली आहे. अशी प्रणाली लागणारे हे भारतातील पहिला विमानतळ आहे. नागपूरच्या आकाशातून दररोज सुमारे ६५० विमानांची ये-जा असते.

या विमानतळास, भारताच्या नागरी उड्डयन महासंचालक कार्यालयाद्वारे नुकताच संकेत 'ई' (कोड-ई) हा दर्जा देण्यात आलेला आहे. याद्वारे बोईंग ७७७, बोईंग ७४७, बोईंग ७८७ या श्रेणीची महाकाय विमानेही येथे उतरू शकतील. येथे एर इंडियाचा एमआरओ (?) देखील तयार झाला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →