दीक्षाभूमी (चंद्रपूर)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

दीक्षाभूमी हे चंद्रपूर शहरातील आणि नागपूरच्या दीक्षाभूमी च्या खालोखाल भारतातील बौद्ध धर्मीयांचे प्रमुख बौद्ध तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी आपल्या ३ लाखापेक्षा अधिक अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. तत्पूर्वी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे १४ व १५ ऑक्टोबर १९५६ रोजी अनुक्रमे ५ लाख व २ लाख अशा एकूण ७ लाखावर अनुयायांनाही दीक्षा दिली होती. त्यामुळे या दोन्ही स्थळांना ‘दीक्षाभूमी’ म्हणले जाते.

बाबासाहेबांनी चंद्रपूरला ज्या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या ठिकाणी त्यांच्या नावाचे 'डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय' सुरू आहे. आणि काही कालावधीनंतर या दीक्षाभूमीवर एक विशाल स्तूप उभारला जाणार आहे. वर्षभर बौद्ध अनुयायी येथे भेटी देत असतात, परंतु दरवर्षातील धर्म चक्र अनुवर्तन दिनाला म्हणजेच १४, १५ व १६ ऑक्टोबर (अनुवर्तन दिनी) रोजी १० लाखापेक्षा अधिक बौद्ध लोक येथे भगवा बुद्धांना व बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र जमा होऊन हा दिवस उत्साहात साजरा करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →