धर्मचक्र अनुवर्तन दिन किंवा दीक्षा वर्धापन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धर्मचक्र अनुवर्तनदिनी नागपूरला येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, दिनांक १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत "धर्मचक्र अनुवर्तन" केले; तेव्हापासून हा दिवस "धर्मचक्र अनुवर्तन दिन" म्हणून साजरा केला जातो. तथापि, या सणाला "दीक्षा वर्धापन दिन" असेही म्हणले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →धम्मचक्र प्रवर्तन दिन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.