स्मोलेन्स्क हवाई दुर्घटना

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

स्मोलेन्स्क हवाई दुर्घटना

एप्रिल १०, इ.स. २०१० रोजी पोलिश वायुसेनेच्या ३६व्या विशेष विमानवाहतूक रेजिमेंटचे तुपोलेवने बनवलेले तू-१५४ विमान रशियातील स्मोलेन्स्क ओब्लास्टच्या स्मोलेन्स्क शहराजवळील उत्तर स्मोलेन्स्क विमानतळाजवळ कोसळले. या दुर्घटनेतील ९७ मृतांत पोलंडचे राष्ट्राध्यक्ष लेक कझिन्स्की, पोलंडच्या सैन्याचे उच्चाधिकारी, नॅशनल बँक ऑफ पोलंडचे गव्हर्नर, अनेक मंत्री, पोलंडच्या संसदेचे सदस्य, धार्मिक नेते यांचा समावेश होता. ही मंडळी केटिन हत्याकांडाच्या ७०व्या स्मृतिदिनानिमित्त वॉर्सोहून स्मोलेन्स्कला चालली होती.

या दुर्घटनेची कारणे अद्याप समजलेली नाहीत आणि बरीचशी माहिती अटकळींवर आधारित आहे. बातमीसंस्थांच्या अहवालानुसार वैमानिकांने दाट धुक्यात उतरण्याचे चार प्रयत्न केले. स्मोलेन्स्कच्या तळ-नियंत्रकाने(भू-नियंत्रक) (ग्राउंड कंट्रोल) वैमानिकांना तेथे न उतरता मिन्स्क किंवा मॉस्कोला जाण्याचा सल्ला दिल्याचेही अहवाल आहेत. उतरण्याच्या चौथ्या प्रयत्नादरम्यान विमान धावपट्टीपासून साधारण दीड किमीवर ग्लाइडस्लोप (तरंग-उतरण) पेक्षा खूप खाली येऊन झाडांना आदळले व जमिनीवर कोसळले.

विमानातील ८ कर्मचारी आणि ८९ प्रवासी यांच्यासह (एकूण ९७) सगळेजण अपघातात ठार झाले. हा अपघात पोलंडच्या इतिहासातील आणि २०१०मधील विमानअपघातांतील सगळ्यात जास्त घातक अपघात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →