जर्मनविंग्ज फ्लाइट ९५२५

थोडक्यात पण महत्त्वाचे.

जर्मनविंग्ज फ्लाइट ९५२५

जर्मनविंग्ज फ्लाइट ९५२५ हे जर्मनविंग्जचे स्पेनच्या बार्सिलोनाहून जर्मनीच्या ड्युसेलडॉर्फकडे जाणारे उड्डाण होते. २४ मे २०१५ रोजी एअरबस ए३२०-२०० प्रकारचे हे विमान आग्नेय फ्रान्समधील नीस शहराच्या १०० किमी वायव्येस आल्प्स पर्वतरांगेतील एका गावाजवळ कोसळले. ह्या दुर्घटनेमध्ये विमानामधील सर्व १४४ प्रवासी व ६ कर्मचारी ठार झाले.

मध्य युरोपीय प्रमाणवेळेनुसार १०:०० वाजता ह्या विमानाने बार्सिलोनाहून उड्डाण केले व ते ११:३९ वाजता ड्युसेलडॉर्फमध्ये पोचणे अपेक्षित होते. १०:३१ वाजता कोणत्याही परवानगीविना किंवा संदेशाविना हे विमान ३८,००० फूट उंचीवरून खाली येऊ लागले. वैमानिकांसोबत संपर्काचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

हा अपघात सहवैमानिक अँड्रिआस लुबित्झने मुद्दामहून घडवून आणला. त्याने याआधी आत्मघातकी विचारांबद्दल उपचार घेतलेले होते व त्यावेळी डॉक्टरांनी त्याला काम करण्यास लायक नसल्याचे जाहीर केलेले होते. लुबित्झने हे लपवून ठेवले व तो परत नोकरीवर रुजू झाला. या फ्लाइटने क्रुझ करण्याची उंची गाठल्यावर मुख्य वैमानिक कक्षा बाहेर गेला असता लुबित्झने दार आतून बंद केले आणि विमानाला थेट डोंगरावर कोसळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →