बुद्ध एर फ्लाइट १०३

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बुद्ध एर फ्लाइट १०३

सप्टेंबर २५, इ.स. २०११ रोजी सकाळी बुद्ध एरवेझच्या बीचक्राफ्ट १९००-डी प्रकारच्या विमानाला फ्लाइट क्रमांक बीएचए १०३ च्या दरम्यान अपघात झाला. विमान काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना कोटदंडा येथे कोसळले. त्यात १० भारतीयांसह एकूण १९ प्रवासी मृत्युमुखी पडले. इतर ९ प्रवाशांपैकी २ अमेरिकन, एक जपानी व ६ नेपाळी प्रवासी होते. यात चालकदलातील सर्व म्हणजे ३ही जणांचा मृत्यू झाला.

नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर, त्यातील पर्यटकांना माउंट एव्हरेस्ट दाखविल्यावर ते विमान काठमांडू येथे परतत असतांना हा अपघात झाला. विमान कोटदंडाच्या पर्वतशिखरास धडकले असा प्राथमिक अंदाज आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →