एम्मा शार्लोट डुएरे वॉटसन ( १५ एप्रिल १९९०) एक इंग्रजी अभिनेत्री, मॉडेल आणि कार्यकर्ता आहे. पॅरिसमध्ये जन्मलेल्या आणि ऑक्सफोर्डशायर मध्ये वाढलेल्या एम्माने ड्रॅगन स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि स्टेजकोच थिएटर आर्ट्सच्या, ऑक्सफोर्ड शाखेत अभिनेत्री म्हणून प्रशिक्षण घेतले. लहान वयात, एम्माला हॅरी पॉटर चित्रपटाच्या मालिकेत, हरमायनी ग्रेंजर म्हणून अभिनयाची भूमिका मिळाली व ती खुप गाजली. पूर्वी एम्माने फक्त शालेय नाटकांमध्ये भूमिका केल्या होत्या. एम्मा इ.स २००० च्या दशकात सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री होती.
२००७ मध्ये बॅले शूज या पुस्तकाच्या टेलीव्हिजन मालिकेत एम्माने भूमिका केली आणि तिने "द टेल ऑफ डेस्पीरॉक्स" (२००८) या चित्रपटात पार्श्व स्वर दिला. हॅरी पॉटर मालिकेतील शेवटच्या चित्रपटानंतर तिने माय व्हिक व्हिथ मर्लिन (२०११), "द पर्क्स ऑफ बीइंग अ वॉलफ्लॉवर" (२०१२) आणि "द ब्लिंग रिंग" (२०१३) मधील मुख्य भूमिका आणि इतर भूमिका साकारल्या. "दिस इज द एंड" (२०१३) मध्ये एम्माने स्वतःची अतिशयोक्तीपूर्ण आवृत्ती म्हणून भूमिका साकारली, आणि "नोव्हा" (२०१४) मध्ये दत्तक मुलीचे भूमिका निभावली.. २०१७ मध्ये, तिने "ब्यूटी अँड द बीस्ट" चित्रपटात, बेलेची भूमिकेत केली. तिच्या इतर भूमिकांमध्ये "रिग्रेशन" (२०१५), "कोलोनिया" (२०१५) आणि "द सर्कल" (२०१७) यांचा समावेश आहे.
२०११ ते २०१४ पर्यंत एम्माने आपला चित्रपटांवर काम चालु ठेवत, शिक्षण पण केले व तिने ब्राऊन युनिव्हर्सिटी आणि "वॉरेस्टर कॉलेज, ऑक्सफोर्ड" येथे शिक्षण घेऊन मे २०१४ मध्ये इंग्रजी साहित्यात पदवी मिळवली. तिच्या मॉडेलिंगच्या कामात बर्बेरी आणि लॅन्कोमेच्या मोहिमांचा समावेश सुद्दा आहे. "पीपल ट्री" नावाच्या कपड्यांच्या ब्रॅंन्डच्या काही उत्पादनासाठी तिने आपले नाव वापरू दिले.. २०१४ मध्ये ब्रिटिश अॅकॅडमी ऑफ फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन आर्ट्स या संस्थेमार्फत तीला ब्रिटिश आर्टिस्ट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला.. त्याच वर्षी, तिला यूएन महिला सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले आणि यूएन महिला अभियानासाठी तिने खुप् हातभार लावले.
एम्मा वॉटसन
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.