एडप्पाडी करुप्पा पळणीस्वामी (जन्म १२ मे १९५४) हे एक भारतीय राजकारणी आहेत. सध्या ते तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते आहेत. २०१७ ते २०२१ पर्यंत त्यांनी तामिळनाडूचे ७ वे मुख्यमंत्री म्हणून काम केले. २८ मार्च २०२३ पासून ते अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम चे सरचिटणीस आहेत.
पळणीस्वामी यांनी १९८९, १९९१, २०११, २०१६, २०२१ मध्ये एडप्पाडीचे विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. १९९८ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ते तिरुचेंगोडेचे प्रतिनिधीत्व करणारे लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले. १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणूकीत ते हरले.
२०११ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी जयललिता यांच्या मंत्रिमंडळात महामार्ग आणि लघु बंदर मंत्री म्हणून काम केले. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणूनही काम केले.
एडप्पाडी पळणीस्वामी
या विषयातील रहस्ये उलगडा.