एकमत

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

एकमत हे भारताच्या लातूर, औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, जालना आणि सोलापूर या नऊ जिल्ह्यात प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे.

मुख्यालय - लातूर, महाराष्ट्र

एकमत हे मराठीतील एक अग्रगण्य दैनिक आहे. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमधील हे एक आघाडीचे दैनिक आहे.

संकेतस्थळ http://www.dainikekmat.com

पुरोगामी विचाराचे दैनिक एकमत हे लातूर (महाराष्ट्र) येथून प्रकाशित होणारे मराठी भाषिक दैनिक आहे. हे दैनिक अमित पब्लिकेशनातर्फे लातूर येथून प्रसिद्ध केले जाते. एकमतचे संस्थापक माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आहेत. या वृत्तपत्राची सुरुवात १९९४ पासून झाली. या दैनिकाने २००४ मध्ये ०.९८ दशलक्ष वाचकसंख्येचा आकडा गाठला. तसेच या दैनिकाच्या आवृत्त्या लातूरसह नांदेड, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, सोलापूर, परभणी, हिंगोली येथूनही प्रकाशित केले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →