एकता भयान (१९९५ - ) एक पॅराअॅथलीट आहे. महिलांच्या क्लब थ्रो आणि डिस्कस थ्रो (थाळी फेक) खेळांमध्ये ती भारताचे प्रतिनिधित्व करते. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे २०१८ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि क्लब थ्रो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.
वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या लंडन 2017 आणि दुबई 2019 अशा सलग दोन आवृत्तींमध्ये भाग घेतल्यानंतर तिने पॅरालिम्पिकच्या कोटातून तोक्यो 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले. 2016 मध्ये बर्लिन, 2017 मध्ये दुबई आणि 2018 मध्ये ट्युनिशिया येथे झालेल्या आयपीसी ग्राँ प्री स्पर्धांमध्ये भाग घेत तिने अनेक पदकांची कमाई केली आहे.
सन 2016, 2017 आणि 2018च्या राष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकविणारी एकता ही विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन आहे. 2018 मध्ये तिला राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवाय, 2019 मध्ये महिला दिनानिमित्य हरियाणाच्या माननीय राज्यपालांच्या हस्ते तिला राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
गोस्पोर्ट्स फाऊंडेशनच्या पॅरा चॅपियन कार्यक्रमाच्या माध्यमातून तिला सहाय्य पुरवले जाते. [4]
एकता भयान
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.