ईझी जेट ही युनायटेड किंग्डममधील विमानवाहतूक कंपनी आहे. लंडन-ल्यूटन विमानतळावरून विमानसेवा देणारी ही सगळ्यात मोठी कंपनी आहे. ईझी जेट ही विमान कंपनी देशांतर्गत व ३२ परदेशांत मिळून ७०० गंतव्यस्थानांना जाण्यासाठी विमान सेवा पुरवते.( ईझी जेट लंडन स्टॉक मार्केटमध्ये नोंदणी असून हे समभाग एफटीएसई १००चा भाग आहेत. ३० सप्टेंबर २०१४ अखेर ईझी जेट मध्ये ८,९०० पेक्षा अधिक कर्मचारी काम करीत होते. बव्हंशी एरबस ए३१९ प्रकारच्या विमानांचा ताफा असलेल्या ईझी जेटची युरोपात २४ ठाणी आहेत. त्यात सर्वात मोठे गॅटविक येथे आहे. ईझी जेटने २०१४मध्ये साडे सहा कोटीहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली होती. Ryanair रायनएर या किफायतशीर प्रवास देणाऱ्या कंपंनीनंतर ईझी जेटचा किफायतशीर सेवेत दुसरा नंबर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इझीजेट
या विषयातील रहस्ये उलगडा.