इंटरस्टेट ८० तथा आय-८० हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्यभागातून भागात पूर्व-पश्चिम धावणारा हा रस्ता कॅलिफोर्निया राज्यातील सान फ्रांसिस्को शहराला न्यू जर्सी राज्यातील टीनेक शहराला जोडतो. याचे पूर्वेचे टोक न्यू यॉर्क शहरापासून ४ मैल अंतरावर आहे. संपूर्ण देश पार करणारा हा महामार्ग अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात लांब इंटरस्टेट महामार्ग (आय-९० नंतर) आहे.
हा महामार्ग २,८९९.५४ मैल (४,६६६.३६ किमी) लांबीचा असून तो कॅलिफोर्निया, नेव्हाडा, युटा, वायोमिंग, नेब्रास्का, आयोवा, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, पेनसिल्व्हेनिया आणि न्यू जर्सी राज्यांतून जातो.
इंटरस्टेट ८०
यामागील विज्ञान आणि इतिहास.