इंटरस्टेट ३५

यामागील विज्ञान आणि इतिहास.

इंटरस्टेट ३५ तथा आय-३५ हा अमेरिकेतील महामार्ग आहे. देशाच्या साधारण मध्यभागातून भागात उत्तर-दक्षिण धावणारा हा रस्ता मिनेसोटा राज्यातील डुलुथ शहराला टेक्सास राज्यातील लारेडो शहराला जोडतो. मिनियापोलिस-सेंट पॉल आणि डॅलस-फोर्ट वर्थ ही महानगरे तसेच कॅन्सस सिटी, ओक्लाहोमा सिटी ही मोठी शहरे या महामार्गावर आहेत.

हा महामार्ग १,५६९.०६ मैल (२,५२५.१६ किमी) लांबीचा असून तो मिनेसोटा, आयोवा, मिसूरी, ओक्लाहोमा आणि टेक्सास राज्यांतून जातो.

आय-३५ मिनियापोलिस-सेंट पॉल आणि डॅलस-फोर्ट वर्थ या जुळ्या शहरांत प्रवेशताना त्याचे आय-३५ई आणि आय-३५डब्ल्यू असे दोन भाग होतात व शहराबाहेर पडल्यावर दोन्ही भाग एकत्र येऊन पुन्हा आय-३५ नावाने ओळखले जातात. आय-६९ खेरीज आय-३५ हा असे एकाक्षरी विसर्ग असलेला अमेरिकेतील दुसरा महामार्ग आहे. इतर सगळ्या महामार्गांतून फाटे फुटल्यावर त्यांना तीन आकडी क्रमांक दिले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →