इंग्लंड क्रिकेट संघ आणि मेरीलिबॉन क्रिकेट क्लब ने ऑक्टोबर १९५१-मार्च १९५२ दरम्यान भारत, पाकिस्तान आणि सिलोनचा दौरा केला. इंग्लंड संघाने भारतात पाच कसोटी सामने खेळले तर मेरीलिबॉन क्रिकेट क्लबने भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेत स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सामने खेळले. भारताला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा इंग्लंडचा हा प्रथमच भारत दौरा होता. जरी भारत आणि पाकिस्तान पूर्वी ब्रिटिश भारत म्हणून कसोटी सामने खेळले होते परंतु फाळणीनंतर पाकिस्तानला अद्याप कसोटी दर्जा दिला गेला नव्हता म्हणून एम.सी.सी. ने पाकिस्तान मध्ये प्रथम-श्रेणी सामने खेळले तसेच सिलोनच्या दौऱ्यातदेखील एम.सी.सी. ने स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सामने खेळले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत, पाकिस्तान आणि सिलोन दौरा, १९५१-५२
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?