आसामी विकिपीडिया

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

आसामी विकिपीडिया

आसामी विकिपीडिया ही मुक्त ज्ञानकोश विकिपीडियाची आसामी भाषेतील आवृत्ती आहे. याचे डोमेन २ जून २००२ रोजी अस्तित्त्वात आले. जुलै २०१५, मध्ये या आवृत्तीने ३,६०० लेखांचा टप्पा ओलांडला. या विकिपीडियात २९,२७० नोंदणीकृत वापरकर्ते आणि ८,३१६ लेख आहेत.

गुवाहाटीमधील गुवाहाटी विद्यापीठात जानेवारी २९,२०१२ रोजी प्रथम आसामी विकिपीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती आणि नंतर दुसऱ्यांदा १ फेब्रुवारी २०१२ रोजी तेजपूरमधील तेजपूर विद्यापीठात संपादन लोकांना विकीवर संपादन आणि योगदान कसे करायचे याची माहिती दिली. नंतर, आसाममधील विविध ठिकाणी समुदाय सदस्यांनी इतर अनेक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →