उडिया विकिपीडिया ( उडिया: ଓଡ଼ିଆ ଉଇକିପିଡ଼ିଆ ) (किंवा ओडिया विकिपीडिया) ही विकिपीडियाची उडिया भाषेतील आवृत्ती आहे. हा एक निःशुल्क, वेब-आधारित, सहयोगी ज्ञानकोश प्रकल्प आहे ज्याचे समर्थन ना-नफा संस्था विकिमीडिया फाउंडेशन करीत आहे. जून २००२ मध्ये हा प्रकल्प सुनीत समेथा यांनी सुरू केला होता आणि मे २०११ मध्ये हे ज्ञानकोश १००० लेखांवर पोहोचले. २००२ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या चार भारतीय विकिपीडियापैकी हे ज्ञानकोश आहे. आता २० पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये विकीपीडिया उपलब्ध आहे. उडिया विकिपीडियावर प्रथम संपादन ३ जून २००२ रोजी झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उडिया विकिपीडिया
या विषयातील रहस्ये उलगडा.