आले

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

आले

आले हे महत्त्वाचे मसाल्याचे पीक असून त्याची लागवड मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करतात. हे पीक उष्ण हवामानात चांगले येते. आले ही एक वनस्पती आहे. तिचे मूळ हे सुगंधी असल्याने मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जाते.

आले हे खोकला घालविण्यासाठी खाल्ले जाते, तसेच अनेक औषधांमध्ये वापरले जाते. आले मसाला म्हणून स्वयंपाकातही वापरले जाते. हळदीप्रमाणेच 'जमिनीखालील मुळी' म्हणून याला ओळखले जाते. आल्यास लागवडीची दीर्घकालीन परंपरा आहे.आशिया खंडात उत्पन्न होऊन भारतात, तसेच दक्षिण आशिया, पश्चिम आफ्रिका व कॅरिबियन बेटे येथे त्याची लागवड केली जाते. काही वस्तूंच्या नावापासून वेगळेपणा जपण्यासाठी आल्यास काही ठिकाणी 'आल्याचे मूळ' असेही म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →