आयटीसी ग्रँड चोला हे भारताच्या चेन्नई शहरातील पंचतारांकित ऐषआरामी हॉटेल आहे. संपूर्ण जगातील लीड (लिडरशीप इन एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंट डिझाइन) यांनी प्रमाणित केलेले विशाल हरित हॉटेल आहे. भारतामधील मुंबईमध्ये असलेल्या रिनैसॉं आणि ग्रँड हयात या हॉटेलनंतर तिसऱ्या क्रमांकावरील हे विशाल हॉटेल येते. अशोक लेलॅन्ड टॉवरच्या रांगेत व एसपीआयसी इमारतीच्या विरुद्ध बाजूला गिन्डी येथे तीन भागात विभागलेले हे हॉटेल आहे. चोला राजघराण्याच्या पारंपारिक द्रविडियन शिल्पकलेच्या धर्तीवर आधारित सिंगापूरस्थित एसआरएसएस या वास्तुशास्त्रज्ञाने या इमारतीचा आराखडा तयार केलेला आहे. या हॉटेलमध्ये ‘इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी ग्रुप स्टारवुड हॉटेल’ची मक्तेदारी असलेल्या अनेक नामांकित चैनीच्या वस्तूंचा संग्रह आहे. अशा चैनीच्या वस्तूंचा संग्रह असलेले या समूहाचे हे नववे हॉटेल आहे.
१,६००,००० चौ.फूट इतक्या अवाढव्य जागेवर बांधलेले देशातले हे एकमेव हॉटेल आहे. बारा अब्ज रुपयांची गुंतवणूक; १,००,००० चौ.फुटांवर बांधलेला विशाल मठ, ३०,००० चौ.फूट आकारमानाचे एकही आधारस्तंभ नसलेले सभागृह – ही काही या हॉटेलची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
आयटीसी ग्रँड चोला हॉटेल
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.