आबीजान मेट्रो

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

आबीजान मेट्रो

आबीजान मेट्रो ( फ्रेंच : Métro d'Abidjan ) ३७.५-किलोमीटर (२३.३ मैल) आहे आयव्हरी कोस्टची आर्थिक राजधानी आबीजानला सेवा देणारे बांधकामाधीन जलद वाहतूक प्रणाली आहे. या मेट्रो मार्गाचे बांधकाम नोव्हेंबर २०१७ मध्ये सुरू झाले, आणि प्रवाशांसाठी सेवा २०२२-२०२३ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा होती, परंतु त्यानंतर कोविड-१९ महामारीमुळे उदघाटनाची तारिक २०२८ पर्यंत लांबविण्यात आल्याचे सांगितले आहे. सुरुवातीला फ्रेंच-कोरियन समोद्देशी संघकंपनी , बुईग-डोंगसान यांनी हाती घेतलेल्या कामात १३ स्थानकांसह एकच मार्ग तयार करण्याची योजना होती. त्यानंतर हा प्रकल्प २० स्थानकांसह एकाच उत्तर-दक्षिण मार्गावर विस्तारित करण्यात आला आहे, ज्यासाठी फ्रान्सने १००% निधी दिला आहे आणि ऑक्टोबर २०१७ मध्ये दक्षिण कोरियाच्या भागीदारांनी या संघकंपनीतून माघार घेतल्यानंतर तीन फ्रेंच गटांनी ( बुईग, त्यांच्या उपकंपन्यांद्वारे बोयग्स ट्रॅव्हॉक्स पब्लिक्स आणि कोलास रेल, अल्स्टॉम आणि केओलिस ) हे काम हाती घेतले आहे.

महागडे बोगदे टाळण्यासाठी, हा मार्ग भूतळावर आणि उन्नत रेल्वे म्हणून बांधला गेला आहे. केबिनमध्ये ड्रायव्हर असलेल्या स्वयंचलित गाड्या ८० किमी/तास (५० मैल/तास) या वेगाने आणि दर २ मिनिटांच्या कमाल वारंवारतेने धावू शकतील. आबीजान मेट्रोच्या पहिल्या मार्गिकेवर दररोज ५,००,००० प्रवासी (वर्षाला १८० दशलक्ष) प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. मार्गिका १ च्या बांधकामासाठी ९२० अब्ज सीएफए फ्राँक (१.४ अब्ज युरो; १.७ अब्ज अमेरिकन डॉलर) खर्च येईल. हा संपूर्ण वित्तपुरवठा फ्रान्सकडून फ्रेंच राजकोष आणि फ्रेंच विकास अभिकरणाद्वारे केला जाईल.

२०१८ मध्ये, आयव्हरी कोस्ट सरकार आबीजान मेट्रोच्या दुसऱ्या मार्गिकेची योजना आखत होते. ही पूर्व-पश्चिम मार्गिका योपूगाँ ते बिंगरविल पर्यंत धावेल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →