आपटे वाचन मंदिर हे महाराष्ट्रातील इचलकरंजी शहरातल्या राजवाडा चौकात असलेले ग्रंथालय आहे. इचलकरंजीचे संस्थानिक गोविंदराव आबासाहेब घोरपडे सरकार यांच्या प्रेरणेने गावातील तत्कालीन प्रसिद्ध वकील रामभाऊ आपटे यांनी सन १८७०मध्ये नेटिव्ह जनरल लायब्ररी सुरू केली. सुरुवातीस मगदूम पीर देवस्थानाच्या नगारखान्यात असलेले हे ग्रंथालय नंतर नवीन वास्तूत आले. नवीन वास्तूसाठी इचलकरंजीचे तत्कालीन जहागीरदार नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी मदत केली. १९१० साली त्याचे नाव आपटे वाचन मंदिर झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आपटे वाचन मंदिर
या विषयातील रहस्ये उलगडा.