मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे रघुनाथ भगवानदास अट्टल अर्थात आर.बी . अट्टल कॉलेज हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात असलेले महाविद्यालय आहे. सदर महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९७१ या वर्षी झालेली आहे. हे महाविद्यालय औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न आहे. सदर महाविद्यालय २७ एकर मैदानावर पसरले आहे. यात प्रशासकीय इमारत, अध्यापानासाठी इमारत, स्वतंत्र ग्रंथालय इमारत, वसतिगृह आणि नव्याने बांधलेल्या इनडोअर स्टेडियम आणि ४०० मीटर ट्रॅक याचा समावेश आहे. त्याचबरोबर महाविद्यालयात जीवनात प्रत्येक क्षेत्रात मोठ्या संख्येने नामांकित यशस्वी विद्यार्थी प्रदान करून गुणात्मक प्रगती केली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →र.भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (गेवराई)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.