आचारी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

व्यावसायिक स्तरावर स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीस आचारी असे म्हणतात. खानावळीच्या क्षेत्रात "शेफ" आणि "आचारी" वेग-वेगळे असले तरी सर्वसाधारण बोलीभाषेमध्ये ह्या दोन शब्दांची अदलाबदल होते. मोठ्या खानावळीत व हॉटेल मध्ये आचार्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये अन्न तयार करणे, शेगडी/स्वयंपाकाचा ओटा व्यवस्थापित करणे, स्वयंपाकघर साफ करणे आणि शेफला मदत करणे यांचा समावेश होतो. बऱ्याच वेळेस हॉटेल आचार्यांना त्यांच्या नियुक्तीत कामानुसार शीर्षक देतात, ब्रॉयलर आचारी (कुक), फ्राय कुक, पॅन्ट्री कुक आणि सॉस कुक ही काही उदाहरणे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →