राहुल अकेरकर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

राहुल अकेरकर

राहुल अकेरकर (१९५८) हा एक भारतीय आचारी (शेफ), उपहारगृहाचा व्यवस्थापक आणि इंडिगोचा संस्थापक आहे. मुंबई शहरात एक युरोपियन जेवणाची संकल्पना असणारे हे हॉटेल १९९९ मध्ये त्याने उघडले. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतीय रेस्टॉरंट उद्योगात, राहुल हे पहिल्या काही भारतीय आचारी (शेफ) पैकी एक होते, जे भारतीय पंचतारांकित हॉटेल उद्योगाच्या बाहेर काम करीत होते. त्यांनी भारतात स्वतंत्र जेवणाचे रेस्टॉरंट सुरू केले आणि काळजीपूर्वक चविष्ट पदार्थ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवेवर लक्ष केंद्रित केले.

एप्रिल २०१९ मध्ये, राहुल अकेरकर यांनी मुंबईच्या लोअर परेलमध्ये क्वालिया नावाचे नवीन रेस्टॉरंट उघडले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →