जनमार्ग, किंवा अहमदाबाद जलद बस परिवहन सेवा, भारतातील गुजरात राज्यातील अहमदाबाद, मधील एक जलद बस परिवहन व्यवस्था आहे. ही सेवा अहमदाबाद महानगरपालिका आणि इतर सहभाग्यांची उपकंपनी असलेल्या अहमदाबाद जनमार्ग लिमिटेडद्वारे चालवली जाते. अहमदाबाद येथील सेप्ट महाविद्यालयाने या प्रणालीचे संकल्पन केले आहे. ऑक्टोबर २००९ मध्ये या प्रणालीचे उद्घाटन झाले. या प्रणालीचे जाळे डिसेंबर २०१७ पर्यंत ८९ किलोमीटर (५५ मैल)आणि मार्च २०२३ पर्यंत १६० किमी झाले. या जलद बस परिवहन प्रणालीत दररोज ३,४९,००० प्रवाशांची संख्या. या प्रणालीने संकल्पन, अंमलबजावणी आणि ऑपरेशनसाठी भारतात आणि परदेशात अनेक पुरस्कार जिंकले. २०१३ मध्ये जलद बस परिवहन मानकांवर या प्रणालीला रौप्य दर्जा देण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अहमदाबाद जलद बस परिवहन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.