अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ

अल्माटी आंतरराष्ट्रीय विमानतळ (कझाक: Toshkent Xalqaro Aeroporti, रशियन: Международный Аэропорт Алматы) (आहसंवि: ALA, आप्रविको: UAAA) हा मध्य आशियामधील कझाकस्तान देशाच्या अल्माटी शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. अल्माटीच्या १५ किमी ईशान्येस स्थित असलेला अल्माटी विमानतळ कझाकस्तानमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. कझाकस्तानची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी कझाकस्तान एरवेझचे मुख्यालय व वाहतूकतळ येथेच आहे.

१९३५ साली बांधण्यात आलेला हा विमानतळ सोव्हिएत राजवटीदरम्यान एक प्रमुख विमानतळ होता. तुपोलेव तू-१४४ ह्या जगातील पहिल्या स्वनातीत विमानाची एकमेव प्रवासीसेवा मॉस्को ते अल्माटी विमानतळादरम्यान चालू करण्यात आली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →